जगाचा नकाशा अवघ्या १४ सेकंदांत ओळखणारा राजवीर ठरला 'वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर'
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): खेळण्या-बागडण्याच्या आणि नुकतेच बोबडे बोल बोलण्याच्या वयात येथील एका पावणेदोन वर्षांच्या चिमुरड्याने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर थेट जागतिक पातळीवर मराठवाड्याचा डंका वाजवला आहे. येथील सुप्रिया आणि प्रशांत घुमरे यांचा चिरंजीव राजवीरने याने जागतिक नकाशावरील सर्व खंड अवघ्या १४ सेकंदांत अचूक ओळखून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एका नव्या जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
२ मे रोजी राजवीरने हा ऐतिहासिक पराक्रम केला. या अधिकृत प्रयत्नाच्या दिवशी राजवीरचे वय अवघे १ वर्ष, १०
महिने आणि १९ दिवस इतके होते. एवढ्या लहान वयात सहसा मुलांना नीट शब्दही उच्चारता येत नाहीत; मात्र राजवीरने जगाच्या नकाशावरील सातही खंड (आशिया, आफ्रिका, युरोप,
उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका) डोळ्याचे









