पैठणला रामनवमी उत्साहात

Foto
रामनामाचा गजर करत भक्तांचा जल्लोष

पैठण, (प्रतिनिधी): दक्षिण काशीतील पैठणमध्ये गुरुवारी मोठ्या भक्तीमय व उत्साही वातावरणामध्ये भगवान राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

या वेळी शहरातील दुर्गावाडीतील बालाजी मंदिरात जर गल्लीतील राम मंदिरात, नाथवाड्यात, कावळे गल्ली गल्लीतील राम मंदिरात, परदेशी पुरातील कृष्ण मंदिरात, संत नगर मधील हनुमान टेकडी, टेकडीतील राम मंदिरात जोगेश्वरी मंदिरात सह्याद्री
चौकातील मंदिरात त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र पैठणला आले असता जुन्या तेलवाडीतील गोदावरी काठी त्यांनी महादेव पिंडीची स्थापना केली होती. त्या रामतीर्थावर व अन्य मठ मंदिरात भक्तीमय वातावरणामध्ये रामायणची भजने गाऊन भाविकांनी हा उत्सव साजरा केला अमृतराया मठामध्ये राम नवमी उत्सवात प्रफुल बुवा तळेगावकर महाराज कीर्तनात म्हणाले की राम भक्ती मुळे मनुष्याचे जीवन आनंदी मय व सुखमय होते असे सांगितले. 

सायंकाळी श्रीराम यांची मूर्ती भव्य रथामध्ये ठेऊन खंडोबा चौक संभाजी चौक, बसस्थानक चौक, सराफा गल्ली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या घोषणेने संपूर्ण परिसरात दुमदुमून गेला होता.

यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिश बाजी करण्यात आली. या मिरवणुकीत राम भक्त श्री हनुमान यांची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या मिरवणुकीत हजारच्या संख्येने राम भक्त, विविध पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.