जान से प्यारा है अवधपुरी का राम

Foto

कारसेवकांमध्ये उत्साह

उद्या महादिवाळी

राम नाम की ओढ के चादर...
हमे अयोध्या जाना है...
मर जायेंगे... मिट जायेंगे...
 मंदिर वही बनाना है...
 जय श्रीराम...जय श्रीराम ॥
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. राम मंदिरासाठी गेल्या शंभर वर्षात शेकडो आंदोलने झाली. मात्र सर्वात मोठे आंदोलन ठरले 6 डिसेंबर 1992 चे ! त्या कारसेवा आंदोलनात जिल्ह्यातील 3200 कारसेवकांनी भाग घेतला होता. त्या सर्वांसाठी उद्या आनंदाचा परमोच्च क्षण आहे.
राम मंदिर आंदोलनातील प्रत्येक राम भक्ताच्या ओठावर गुंजन घातलेले असलेले हे गीत आता पुन्हा पुन्हा आठवते आहे. रथयात्रेच्या काळात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शेषाद्रीजी, उमा भारती यांनी देशभर दौरे करत वातावरण ढवळून काढले होते. 
औरंगाबाद जिल्ह्यात माजी खासदार कै. मोरेश्वर सावे, तत्कालीन शहर संघचालक सुधीर तुकाराम देशपांडे, विहिप चे जिल्हा मंत्री तथा बजरंग दल संयोजक दयाराम बसय्ये, जगन्नाथ बसय्ये यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होते. गावोगावी शीळापूजन, रथयात्रा काढण्यात आल्या. जिल्ह्यात रमेश पोकर्णा, भाऊराव सातारकर, सुधाकर महाजन, भास्करराव शेवतेकर, राजु जहागीरदार, डॉक्टर सतीश कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, बेगमपुर्‍यातील वाजपेयी काकू,  सूर्यकांत हजारे, गणेश टी हाउसचे बनकर मामा, गंगालाल सिद्ध, सुरेंद्र लिमये, चिकलठाण्याचे किशनराव दहीहंडे, मदनराव नवपुते आदींनी वातावरण ढवळून काढले होते. तर शिवसेनेचे त्यावेळेचे आ. चंद्रकांत खैरे, बंडू ओक, जगदीश सिद्ध, हुकुमचंद भारूका, बजरंग लाल जी शर्मा आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
ती ऐतिहासिक शाल घालून पूजा करणार
अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन हा माझ्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. जगभरातील कोट्यवधी हिंदू बांधवांची पाचशे वर्षापासून असलेली प्रतीक्षा उद्या संपणार आहे. शेकडो आंदोलने आणि हजारो जणांचे बलिदान याचे स्मरणही उद्या होईल. 6 डिसेंबर 1992 च्या कार सेवेत जीवावर उदार होऊन आम्ही जय श्रीराम... होगा काम... चा नारा दिला होता. लाखो भक्तांनी कार सेवा केली. ज्यांनी मर जायेंगे... मिट जायेंगे म्हणत राम मंदिराची शपथ वाहिली. त्या सर्वांचा उद्या दिवाळीचा सण. कार सेवेच्या वेळी विद्याशंकर भारती, दादा धनेश्वर यांच्यासह संत महंतांनी आम्हाला राम नामाची शाला भेट दिली होती. गेल्या तीस वर्षांपासून मी ती शाल जपून ठेवली आहे. आता मी ती शाल घालून रामाची पूजा करणार आहे, असे सांगताना दयारामजी यांना गहिवरून आले.
बसय्यै बंधूंनी लपवली भरताची मूर्ती
6 डिसेंबरला अयोध्येत कार सेवेसाठी गेलेल्या जगन्नाथ आणि दयाराम बसय्ये बंधूंनी हिमतीची पराकाष्टा केली. सकाळी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांची भाषणे सुरू असताना लाखो भक्त जय श्रीराम चा जयघोष करीत होते. अचानक दोघे मशिदी कडे धाव घेत घुमटावर चढले. त्यांनी तेथून दोरी खाली टाकत आणखी दोघांना वरती ओढले. अन भगवा झेंडा रोवला. त्यानंतर संतप्त कार सेवकांनी तारेचे कुंपण तोडले अन पाहता पाहता कार सेवा सुरू झाली. पहिल्यांदा मीर बाकीची भिंत पाडण्यात आली. असंख्य कारसेवक मशिदीत शिरले विद्याशंकर भारतीजी आणि दादा धनेश्वर यांनी श्रीरामाची मूर्ती आपल्या कुशीत घेत सुरक्षित स्थळी हलवली तर दयाराम आणि जगन्नाथ बसय्यै यांनी भरताची मूर्ती कुशीत घेत सुरक्षित स्थळी आसरा शोधला होता.
मोरेश्वर सावे यांना दिली होती धर्मवीर पदवी !
तेव्हा शिवसेनेत असलेले माजी खा. कै. मोरेश्वर सावे यांचे कार सेवा आंदोलनातील योगदान प्रचंड मोठे आहे. या आंदोलनात जिल्ह्याचे नेतृत्व त्यांनी केले.  त्यांना अटकही झाली होती खटला चालू आहे. हजारो राम भक्तांमध्ये चैतन्याची ज्योत पेटविण्याचे काम त्यांनी केले. कार सेवेत प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांनी राम नामाचा झेंडा रोवला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी पाडल्याचा अभिमान व्यक्त करीत मोरेश्वर सावेना त्यावेळी धर्मवीर ही पदवी बहाल केली होती.
त्यावेळी जीव वाचला म्हणून आजचा दिवस पाहतोय :  गिरिजाराम हाळनोर 
पंढरपूरच्या सभेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कार सेवेचे आवाहन केले होते. त्यानुसार तत्कालीन आ. चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात माझ्यासह सुदाम वाघमारे, प्रशांत मस्के, प्रशांत पानसरे, ललित सूर्यवंशी, बंडू ओक, बापू जहागिरदार आदी कार सेवक 5 डिसेंबरला रात्री अयोध्येला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी नेत्यांची भाषणे आणि जल्लोष सुरू झाला. आणि बघता बघता कार सेवेलाही सुरुवात झाली. सर्वत्र जय श्रीराम चा नारा होता. स्थानिक पोलीस सुद्धा भक्तांच्या आंदोलनात सहभागी झाले. जय श्रीराम... होगा काम एवढ्या घोषणाच आसमंतात दुमदुमत होत्या. बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर देशभर दंगली उसळल्या. गाड्या बंद असल्याने आम्हाला फैजाबाद पर्यंत पायी यावे लागले. दंगली सुरू झाल्याने नेत्यांनी आम्हाला रस्त्यात काहीही खाऊ नका असा आदेश दिला होता. मात्र एका स्थानकांवर राम भक्तांनी आम्हाला शपथ घालत पुरी भाजी खायला दिली. तब्बल वीस तासांनंतर आम्ही एकेक पुरी खाल्ली. भुसावळ हुन आम्हाला पोलीस संरक्षणात औरंगाबादला आणण्यात आले. आता उद्या तो ऐतिहासिक क्षण आयुष्यात परतला आहे.
सुवर्णाक्षरांनी लिहावा असा क्षण : रोहित सर्वज्ञ 
राम मंदिर आंदोलन हे जगातील एक अभूतपूर्व  आंदोलन होते. कोट्यवधी हिंदूंची अस्मिता असलेल्या रामाचे मंदिर भव्यदिव्य व्हावे अशी इच्छा बाळगून  असलेल्यांसाठी उद्या परमोच्च आनंदाचा क्षण आहे.  भारतीयांची मान गर्वाने ताठ व्हावी असा हा क्षण. अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये प्रभू रामचंद्राची थ्रीडी प्रतिमा झळकत आहे यावरूनच जगभरात राम मंदिराची किती उत्सुकता आहे, हे दिसून येते. राम मंदिराची आंदोलन हे सर्व समाजाचे आंदोलन होते. जो भारत भूमीला माता समजतो तो हिंदू. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अथवा कोणत्याही पक्षाशी निगडित या आंदोलनाकडे पाहू नये. उद्याचा क्षण डोळ्यात साठवावा असाच आहे.
आयुष्यभर राम नामाचा जप : आ. सावे 
वडिलांनी आयुष्यभर रामनामाचा जप करीत राम मंदिराची स्वप्न पाहिले होते. विश्व हिंदू परिषदेच्या प्रत्येक कामात हे अग्रेसर असायचे. कार सेवेच्या काळात त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने राम भक्तावर मोठे अत्याचार केले. त्याचे साक्षीदार मोरेश्वर सावेजी होते. राम मंदिर आंदोलनात त्यांनी झोकून देऊन कार्य केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासोबत त्यांचा सतत संपर्क असायचा. उद्या राम मंदिर भूमिपूजन प्रसंगी वडिलांची आठवण होईल यात शंका नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker