सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड येथे रमजान ईद सण उत्साहात पार पडला. मुस्लिम बांधवानी शहरातील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाज अदा केली. सकाळी ८ : ३० वाजता ईदगाह येथे ईदच्या नमाजला सुरुवात झाली होती. आ. अब्दुल सत्तार यांनी देखील शहरातील ईदगाह येथे नमाज पठण करून उपस्थितांना रमजान ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
नमाजानंतर आ. अब्दुल सत्तार यांच्यासह नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, जि. प. सदस्य अब्दुल आमेर अ. सत्तार यांनी उपस्थित बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह पहायला मिळाला. ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा चे आयोजन केले होते. तर संपूर्ण शहरात सर्व धार्मिय बांधवांना एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देतांना दिसले.
ईदगाह येथे नगर परिषदेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. याप्रसंगी नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, न. प. तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, शिवसेना पदाधिकारी तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, मनोज झंवर, किशोर अग्रवाल, प्रशांत क्षीरसागर, विनोद मंडलेचा, शंकरराव खांडवे, विशाल जाधव, सुधाकर गायकवाड, राजू गौर, संजय आरके, जितू आरके, शिवा टोम्पे, प्रवीण मिरकर, अमोल कुदळ, राजेश्वर आरके, धम्मा दांडगे आदीसह पदाधिकारी अधिकारी व सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.
आ. अब्दुल सत्तार यांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी शहरातील आ. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड तसेच विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, व्यापारी, नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.














