छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना गोलवाडी लिंकरोड परिसरात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजबसिंग मानसिंग बहुरे रा. रांजणगाव कमळापूर फाटा रांजणगाव असे आरोपीचे नाव आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार जून २०१९ मध्ये महिलेची आरोपीशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत महिलेशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. महिला गर्भवती राहिल्यानंतर अनेकदा गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. सध्या महिला अडीच महिन्यांची गर्भवती आहे. आपले नाते जर उघडकीस आले तर मी तुला सोडून देईल, स्वतःचा जीव देईल, अशी धमकी देत आरोपीने महिलेला इमोशनल ब्लॅकमेल केले. अखेर फसविल्याचे लक्षात येताच महिलेने सातारा पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. पुढील तपास सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउनि राख या करीत आहेत.













