पैठण, (प्रतिनिधी) : पैठण येथे गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार दिवाळीनिमित्त शिधावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत आ. विलास भुमरे यांच्या हस्ते ढोरकीन, बिडकीन, चितेगाव व पिंपळवाडी या चार जिल्हा परिषद गटांसह पैठण शहरातील गरजू लाभार्थी व विधवा महिलांना शिध्याचे वाटप करण्यात आले.
सणासुदीच्या काळात समाजातील गरजू, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या कुटुंबातही आनंदाची दिवाळी साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हाच या उपक्रमामागील प्रामाणिक उद्देश आहे.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शेतकरी, शेतमजूर, कामगार बांधव तसेच गरजू महिलांच्या हितासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, त्यांच्या कल्याणासाठी यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी रमेश पवार, नंदू अण्णा काळे, आप्पासाहेब निर्मळ, पुष्पाताई गव्हाणे, विनोद बोंबले, वैशाली बोंबले, विजय गोरे प्रियंका भुजंग, दादासाहेब गलांडे, शिवाजी तांबे, काकासाहेब टेके, रवींद्र काळे, संजय लघाने, कारभारी लोहकरे, बाबासाहेब मुळे, यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












