सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड येथे रावण दहन कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला. आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणाऱ्या रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी
केली होती. शहरातील दुर्गामाता मंदिरा मागील पूर्णे श्वर गणपती मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रावण दहन समितीच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. तर आ. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
रावण दहन नंतर समितीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उपस्थितांनी हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. रावण दहन सुरू होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, केशवराव तायडे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, नंदकिशोर सहारे, माजी नगरसेवक प्रताप प्रशाद, विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, सुधाकर पाटील, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, राजू गौर, गिरीश शाह, इम्रान शेख, रावण दहन समितीचे जगन्नाथ कुदळ, देविदास वाकडे, पांडुरंग डवणे, बाबुराव वाकडे, रामभाऊ भाग्यवंत यांच्यासह राजेंद्र बन्सोड, दत्ता वाघ, फहिम पठाण, दिगंबर वाघ, रामदास कुदळ, सतीश कुलकर्णी, अशोक बन्सोड, कैलास इंगे, सुभाष बन्सोड, रत्नाकर वाघ, फहिम पठाण, पंडित मिरगे, संजय प्रशाद, दिलीप वाघ, कृष्णा वाघ, विनोद भोजवणी, कुणाल सहारे, संदीप हाडोळे, सुनील दुधे, गौरव सहारे आदींची उपस्थिती होती.