सरस्वती विद्यालयात वंदे मातरम् गीताचे वाचन, गायन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) तळणी येथील श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तळणी संचालित, सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळणी येथे सुरत गायन करण्यात आले. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५०वर्ष पूर्ण झाले, या निमित्ताने वंदे मातरम् हे गीत एका सुरात गीत म्हणून साजरे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री अशोक गरूड उपस्थित होते.
वंदे मातरम् या गीताचा इतिहास सुमारे १५० वर्षांपूर्वीचा आहे, जेव्हा बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८७६ मध्ये त्याची रचना केली. हे गीत १८८२ मध्ये त्यांच्या आनंदमठ या कादंबरीतून प्रकाशित झाले आणि नंतर स्वातंत्र्यलढ्यात एक महत्त्वाचे घोषवाक्य बनले. या गीताला १९५० मध्ये भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृतपणे स्वीकारण्यात आले. हा कार्यक्रम ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या
वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रव्यापी स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालावधीत रचनेच्या १५० वर्षांचा हा उत्सव आहे. २०२५ हे वंदे मातरम् चे १५० वे वर्ष आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपाली अंभोरे, तर आभार दिनेश नवले यांनी मानले.