छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः बनावट कुलमुखत्यारपत्राच्या आधारे रजिस्ट्री करीत फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हबीब सालेह हबीब अहमद रा. केशरी बिल्डींग गांधारी रोड कल्याण वेस्ट जि.ठाणे, विजय बाबासाहेब काळे रा. शिवनी बिडकिन ता. पैठण, शेख आयुब अब्दुल करीम रा. आमेरनगर सुधाकरनगर रोड सातारा परिसर अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी नोंदणी कार्यालय क्र. ३ चे सह दुय्यम निबंधक जगदीश रोजेकर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ७ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालय ३ येथे आरोपींनी प्रशांत प्रभाकर पारगावकर यांच्या नावाचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केले. ते खरे असल्याचे भासवून दस्त नोंदणी केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि बचाटे हे पुढील तपास करीत आहेत.








