दाते पाटलांच्या उपोषणानंतर विद्यार्थ्यांना दिलासा
शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून ओबीसीप्रमाणे सवलती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील ने विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-ने सुविधांचा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७व पासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. व या निर्णयानुसार अधिनस्त महाविद्यालयांना -. कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन त्याचा च अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्दे ■ाश देण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील
अभिमत विद्यापीठांमध्येही सवलती द्या
शासन निर्णयात दुरुस्ती करून तांत्रिक, अतांत्रिक व वैद्यकीय शिक्षणासह खासगी विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांमध्येही सवलती लागू कराव्यात, अशी मागणी डॉ. दाते पाटील यांनी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजातील प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अराजकीय आरक्षण ही संकल्पनाही त्यांनी मांडली आहे.
यांनी यासाठी केलेल्या आमरण उपोषण, आंदोलनाचे हे यश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मराठा समाजाला केजी ते पीजीपर्यंत ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळाव्यात, ही मागणी डॉ. दाते पाटील यांनी लावून धरली होती. या मागणीसाठी त्यांनी शहरात
९ ते २४ ऑगस्ट २०२६ दरम्यान १६ दिवस उपोषण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक यांच्यासोबत घडवून आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, भरत गोगावले, अतुल सावे आणि संजय सिरसाट यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















