शेतकर्‍यांच्या कर्जमुक्‍तीचे दावे खोटे, भाजपच्या दानवेंना शिवसेनेच्या दानवेंचे प्रतिउत्तर; शिवसेना देणार पुराव्यासहित जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Foto

औरंगाबाद- केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजपाची युती असली तरी स्थानिक पातळीवर हे दोन्ही पक्ष ऐकमेकांचे वाभाडे काढण्यात धन्यता मानत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप-शिवसेना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत चिखलफेक करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपूर येथे शेतकर्‍यांना नव्वद टक्के कर्जमुक्‍ती केल्याचा दावा केला असून यावर मात्र शिवसेनेने हा दावा खोटा ठरवत पुराव्यासहित जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शेतकर्‍यांना कर्जाबाबत फसवी जुमलेबाजी हे सरकार करत असून कर्जमुक्‍ती केल्याचा खोटा दावा करत आहे. प्रत्यक्षात मात्र 50 टक्केही शेतकर्‍यांची कर्जमुक्‍ती झाली नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना स्पष्ट केले. चुकीचे वक्‍तव्ये करुन शेतकर्‍यांची कर्जमुक्‍तीबाबत फसवा-फसवी केल्या जात असल्याचा आरोपही यावेळी अंबादास दानवे यांनी केला. या विरोधात शिवसेनेच्या वतीने सर्व पुरव्यानिशी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार असून 
कर्जमुक्‍ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना दिला.

शेतकर्‍यांची भाजपकडून फसवणूक 

शेतकर्‍यांना खोटी आश्‍वासने देऊन  भाजप सरकारकडून फसवणूक  केली जात आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांना 
कर्जमुक्‍तीचे गाजर दाखवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे 90 टक्के कर्जमुक्‍ती झाल्याचे खोटे दावे जाहीरपणे करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र 50 टक्केही कर्जमुक्‍ती झाली नसल्याचे हे आम्ही पुराव्यासह सिद्ध करु. असे अंबादास दानवे यावेळी बोलताना म्हणाले