वीजचोरीची माहिती द्या व्हाट्सअ‍ॅपवर

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : धोकादायक वीजयंत्रणा आणि वीजचोरीबाबत नागरिकांनी महावितरणला तत्काळ माहिती देण्यासाठी दोन स्वतंत्र व्हाट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
वीजचोरीची माहिती देण्यासाठी ९०११०७५२०० हा व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर वाकलेले विद्युत खांब, लोंबकळणार्‍या तारा अशा धोकादायक वीजयंत्रणेबाबत तसेच चुकीच्या वीजबिलाबाबत तक्रार करण्यासाठी ९०११०७५६०० हा व्हाट्सअप क्रमांक आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी धोकादायक वीजयंत्रणा आढळून येते. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी अशा बाबी निदर्शनास आणून देण्यासाठी संबंधित व्हाट्सअ‍ॅप क्रमांकावर केवळ फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज सोमवार ते शनिवारी या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेतच पाठवावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.