मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आ. विलास भुमरे यांना निवेदन

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार विलासबापू भुमरे यांना शेतकरी प्रतिनिधींनी निवेदन सादर केले.

आगामी अधिवेशनात पावसाळी मोसंबी उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले की, मराठवाड्यातील लाखो शेतकरी मोसंबी उत्पादनावर अवलंबून असून वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ- उतार, हवामान बदलाचा परिणाम, निर्यातीसाठी आवश्यक सुविधा नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी मोसंबी उत्पादकांच्या हितासाठी विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये मोसंबीला किमान आधारभूत किंमत जाहीर करणे, प्रक्रिया उद्योगांसाठी विशेष अनुदान व पॅकेज देणे, मोसंबी एक्सपोर्ट प्रमोशन बोर्ड स्थापन करणे, पीक विमा योजनेत प्रभावी संरक्षण देणे, मोसंबी बागांसाठी विशेष अनुदान योजना राबविणे, कोल्ड स्टोरेज व निर्यात सुविधांचा विस्तार करणे तसेच महाराष्ट्र मोसंबी हा स्वतंत्र प्रक्रिया उद्योगांचा अभाव तसेच ब्रँड विकसित करून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. 

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वाघमोडे, शाम तांगडे, दिपक हजारे, गोपाल जगदाळे, संदीप घायाळ, दत्तात्रय हजारे, शरद हजारे, दत्तात्रय बारे, महेश थोटे, नवनाथ हजारे आणि पुष्पराज हजारे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व मोसंबी उत्पादकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.