पैठण, (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पैठण येथील हायटेक इंग्लिश स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात भारतीय संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी शाळेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आला.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेविका रुपाली सोनारे माजी केंद्र प्रमुख सुभाष शिंदे संस्थापक डॉ. विष्णू बाबर, अध्यक्षा सुजाता बाबर, प्राचार्या स्वाती शिंदाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तुषारभाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीत व ध्वजगीतानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी तिरंग्याला सलामी दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम, आकर्षक कवायत संचालन, विविध वेशभूषा, देशभक्तीपर गीते, नाटके व नृत्य सादर केले. विद्याथ्यांनी सादर केलेल्या लेझीम पथकाने आणि देशभक्तीपर
गीतांवरील नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितले की प्रजासत्ताक दिन हा आपल्याला आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आजच्या पिढीने तंत्रज्ञानासोबतच राष्ट्रप्रेमाची कास धरणे गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन प्रियांका वाघ व जयंती अब्राहम (शिक्षिका) यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश बाबर यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सर्व विद्याथ्यौना मिठाई वाटप करण्यात आली. या सोहळ्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












