एसटी' प्रवर्गामधून आरक्षण घेणारच, महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग

Foto
खुलताबाद (प्रतिनिधी ) :  बंजारा समाजाला महाराष्ट्रातही हैद्राबाद गॅझेटप्रमाणे एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गाचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी खुलताबाद तहसिल कार्यालयावर  विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो बंजारा समाज बांधव तसेच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता,

 सकाळी अकरा वाजता खुलताबाद बायपास लगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानातून मोर्चाची सुरवात झाली. सुरवातीपासूनच हजारोंच्या संख्येने बंजारा समाजबांधव जमले होते. खुलताबादला बायपास येथुन बाजार पट्टा पाण्याची टाकी येथुन फर्च मोहल्ला साळीवाडा जुने बसस्थानक मार्ग, डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरून  हा विराट मोर्चा खुलताबाद तहसील कार्यालयावर पोचला. 

चारचाकी, दुचाकी, आणि इतर वाहनांच्या ताफ्यातून मोर्चेकरी खुलताबाद येथे आले होते. शहरातील मुख्य रस्त्याने घोषणाबाजी करत डफ वादक पथकासह मोर्चा खुलताबाद तहसिल कार्यालयापर्यंत पोहोचला होता . येथे बंजारा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन महाराष्ट्रात एसटी आरक्षण द्यावे, अशी मागणी केली गेली.खुलताबाद तहसील कार्यालयावर पोचताच या मोर्चाचे रूपांतर मोठ्या सभेत झाले. खुलताबाद तहसील कार्यालयासमोरील परिसरात लोकांची प्रचंड गर्दी उसळली.

तहसिल कार्यालय समोर.विराट सभा संपन्न झाली.या दरम्यान अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीचे पदाधिकारी यांचे भाषणे झाली. यावेळी बंजारा आरक्षण समितीचे  दिगंबर राठोड, वाल्मिक राठोड,मोहन राठोड, वसंत राठोड, किसन राठोड, कुलदीप चव्हाण अदिंची उपस्थिती होती. तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना  देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि बंजारा समाजाला हैदराबाद इस्टेट गॅजेट सन १९२० नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावे  मोर्चा सुरू असताना काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.मोर्चेत बंजारा समाज बांधव एकच मीशन एस टि आरक्षण, हैदराबाद गॅजेट लागु झालाच पाहिजे, गोर बंजाराना  एस टी आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाच, एक गोर सव्वा लाखेर जोर, अशा विविध घोषणा देत होते मोर्चा मध्ये हजारो बंजारा समाज बांधव व महिला उपस्थित होते. 

--महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग --
मोर्चात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हजारो महिलांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी असंख्य महिला पारंपरिक पोशाख परिधान करून मोर्चाला सांस्कृतिक रंग दिला. युवतींनी संघटित पद्धतीने मोर्चाचे नेतृत्व केले.