छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहर पोलिस दलात मंगळवारी (दि. ३०) मोठे फेरबदल पाहायला मिळाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार - यांनी शहरातील १५ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
या खांदेपालटानंतर पोलिस वर्तुळात कुठे आनंदाचे तर कुठे नाराजीचे म्हणजेच 'कही खुशी - कही गम' असे वातावरण आहे. - यामध्ये पुंडलिकनगर ठाण्याची जबाबदारी सांभाळणारे अशोक
भंडारे यांना 'क्रिमी पोस्ट' मानल्या जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी मिळाल्याने त्यांना एकप्रकारे लॉटरीच लागल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, पोलिस ठाण्यात सेकंड पीआय म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आता स्वतंत्र पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून संधी मिळाली आहे.
गच्चेंकडे वाहतूक शाखा
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे यांच्याकडे सिडको वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला आहे.
सहायक निरीक्षकांच्याही बदल्या
सहायक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या. यात नियंत्रण कक्षातील जयश्री कुलकर्णी यांची सिडको पोलिस ठाण्यात, सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मदनसिंग घुणावत यांची जिन्सी पोलिस ठाण्यात, सायबर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक कदीर देशमुख यांची जिन्सी पोलिस ठाण्यात, तर सिडको वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांची मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. मुंबई येथून आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांना नियंत्रण कक्षात पदस्थापना देण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













