मुंबई- अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर तेथील नागरिकांना आज ( रविवारी ) राजीनाम्याच्या कागदी होड्या सापडल्या शिवसेनेचा असा खोचक उपहास एका पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडवला आहे. काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी शरयू नदीची आरती करून आपल्या खिशात असलेल्या राजीनाम्याच्या होड्या केल्या आणि त्या शरयू नदीच्या पात्रात सोडल्या होत्या असे वृत्त मिळते आहे असे विखे यांनी सांगितले.
अयोध्या दौरा हा उद्धव ठाकरे यांचा एक स्टंट असून आपणही भाजप पेक्षा कमी नसल्याचे दाखवून देण्याचा हा उद्धव यांचा प्रयत्न असल्याचं हि विखे म्हणाले.