महिला संघटना अधिक सक्षम करण्यासाठी एकत्रित कामाचा संकल्प : शालिनी नागवडे

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शालिनी नागवडे यांचे अभिनंदन व स्वागत करण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सुवर्णा जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट आयोजित करण्यात आली. 

यावेळी महिला संघटन मजबूत करणे, पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षवाढ तसेच विविध सामाजिक व राजकीय विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी वैशाली नागवडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. शहर व तालुक्यात महिला संघटना अधिक सक्षम करणे, मोठ्या संख्येने महिलांना पक्षाच्या विचारधारेसोबत जोडणे तसेच आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या सदिच्छा भेटीप्रसंगी प्रदेश कार्यकारिणीच्या कांचन ढमाले, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे, जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली साबळे पाटील, शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचरणे, मेहराज पटेल, नगरसेविका सोनाली पाटील, सुनीता जंगले, सुभद्रा जाधव, संगीता वाघ, रेखा राजपूत, प्रियंका, सुनिता सोळंके, शीला जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी शालिनी नागवडे व वैशाली नागवडे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत महिला संघटना अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या भेटीमुळे गंगापूर तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार आहे. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाचे संघटन आणि पक्षवाढीचे काम अधिक जोमाने पुढे नेण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.