श्री मुक्तानंद महाविद्यालयात इतिहास विषयाची एक दिवसीय राष्ट्रीय परिषद
गंगापूर, (प्रतिनिधी) येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक भारतातील स्त्रीवादी चळवळी विचारप्रवाह, आव्हाने आणि रूपांतरेफ्फ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
परिषदेचे उद्घाटन सहसंचालक, उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर विभागाच्या डॉ. पंकजा वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रामराव चव्हाण होते. बीजभाषक म्हणून पुणे येथील प्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रतिमा परदेशी उपस्थित होत्या. बीजभाषणात डॉ. प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, पाश्चात्य स्त्रीवाद एकसंध स्वरूपात मांडला गेला असला तरी भारतीय समाजात स्त्रीवाद विखुरलेल्या रूपात दिसतो.
स्त्रीवादी चळवळीची परंपरागत चौकट बाजूला ठेवून भारतीय सामाजिक वास्तवाच्या आधारे स्त्रीवादाची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. इतिहास व समाजाचे विश्लेषण व्यक्तिनिष्ठ न करता वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून व्हायला हवे, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख व बीजभाषक प्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रतिमा परदेशी मार्गदर्शन करताना. व्यासपीठावर प्राचार्य प्रा. डॉ. रामराव चव्हाण, प्राचार्य डॉ. शिवानंद सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, उपप्राचार्य डॉ. वैशाली बागुल, डॉ. रविकिरण सावंत व इतर मान्यवर. (छाया अलिम चाऊस)
उपप्राचार्य डॉ. वैशाली बागुल यांनी केले. त्यांनी स्त्रीवादी चळवळीच्या ऐतिहासिक टप्प्यांचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. शिवानंद सोनकांबळे यांनी आपले विचार मांडले, तर बीजभाषकांचा परिचय प्रा.
डॉ. सविता वावगे यांनी करून दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. रामराव चव्हाण म्हणाले की, स्त्री व पुरुष हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून सृजनाचा इतिहास हा शोषणाचाही देत स्त्री इतिहास आहे. नैसर्गिक न्याय, विवेक व सत्यनिष्ठा या मूल्यांची जपणूक आवश्यक आहे. उद्घाटक डॉ. पंकजा वाघमारे यांनी प्राचीन भारतातील स्त्रियांच्या स्थितीचा आढावा घेतला. कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथातील स्त्रीविषयक विचारांचा संदर्भपुरुष समानतेचे महत्त्व स्पष्ट केले.
प्रथम सत्रात डॉ. अनिता शिंदे, तर द्वितीय सत्रात डॉ. स्मिता शिंदे यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रात सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंगला खिवंसरा व स्त्रीवादी अभ्यासक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी स्त्री चळवळीच्या विविध टप्प्यांवर सविस्तर विवेचन केले. समारोप अध्यक्षीय भाषण प्रा. डॉ. गीतांजली बोराडे यांनी केले.
या परिषदेत विविध महाविद्यालयांतील सुमारे १०० हून अधिक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. एस. पांचाळ व डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले, तर आभार प्रा. अमोल म्हस्के व डॉ. वैशाली बागुल यांनी मानले.














