उन्हामुळे प्रचारावर परिणाम; उमेदवार देताहेत सकाळ-संध्याकाळ प्रचारावर भर

Foto

औरंगाबाद: उन्हाळ्यामुळे सध्या सूर्यदेव आग ओकत आहे. तापमानाचा पारा 41 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सध्या निवडणूक काळात उमेदवारांना घाम फुटला आहे. तापमानात झालेल्या वाढीचा फटका सध्या उमेदवारांना बसत आहे. त्यामुळे मतदारांना भेटण्याच्या वेळेत बदल केला आहे. सकाळी आणि सायंकाळी  प्रचार करण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापलेले असतानाच नैसर्गिक़ तापमान ही उन्हाळ्यामुळे वाढले आहे. सध्या तापमानाने 41 ओलांडली आहे. सूर्यदेव आग ओकत असल्याने दुपारी प्रचार करणे शक्य नाही. उन्हामुळे नागरिकही आपआपल्या कामावरकिंवा घरात असतात. त्यामुळे उमेदवारांनी ही प्रचाराची वेळ बदलत आता सकाळी 7 वाजेपासून प्रचार करण्यावर भर दिला आहे. दुपारी 2 पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत  प्रचार करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या घरी जावून भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत. निवडणूक 23 एप्रिल रोजी होणार आहे. भर उन्हात निवडणूक होणार असल्याने उमेदवारांना, मतदारांना मतदान करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.