शहरातील मालमत्तांचे होणार फेरमूल्यांकन

Foto
खासगी एजन्सी नियुक्तीसाठी निविदा; १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): करयोग्य मूल्य निश्चित करण्यासाठी महापालिकेने खासगी एजन्सीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मालमत्तांचा अचूक तपशील संकलित करून त्याआधारे यासाठी मालमत्ता कर लावला जाईल. ७ ऑगस्ट रोजी ई-निविदा प्रसिद्ध केली असून, निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट आहे.
२० ऑगस्टला निविदापूर्व (प्री-बिड) बैठक होणार असून, प्राप्त निविदा ३१ ऑगस्टला उघडण्यात येतील. महापालिकेच्या जुलै महिन्यातील
सर्वसाधारण सभेत मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन व सर्वेक्षण करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर झाला होता. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, माहिती संकलन, करयोग्य व भांडवली मूल्याचे मूल्यांकन आणि करनिर्धारणासाठी आवश्यक सहाय्यक सेवा एजन्सीला द्याव्या लागणार आहेत.
यासोबतच शहरातील पाणी जोडण्यांचे सर्वेक्षण, ग्राहक व मीटरची माहिती संकलित करणे, पाणी शुल्क व बिलिंगसाठी
माहिती तयार करणे, व्यावसायिक आस्थापने आणि महापालिकेच्या स्वमालकीच्या मालमत्तांचे सर्वेक्षण व संगणकीकरण करावे लागणार आहे. आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्याची जबाबदारीही एजन्सीवर राहणार आहे. या कामाचा मुख्य टप्पा १८ महिन्यांत पूर्ण करावा लागणार असून,
त्यानंतर पाच वर्षे संबंधित एजन्सीला सेवा व देखभालीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. शहरातील मालमत्तांचे अचूक सर्वेक्षण करून कर आकारणीची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि संगणकीकृत करण्याचा यामागील उद्देश आहे. निविदेतील कामाच्या व्याप्तीत व्यावसायिक आस्थापनांचेही सर्वेक्षण, व्यवस्थापन
आवश्यक प्रणाली विकसित करावी
▶▶ पाणीपुरवठा विभागांतर्गत सर्व नळजोडण्याचे सर्वेक्षण, भू-अनुक्रमांकन, ग्राहक व जोडणीची माहिती संकलित करणे, जलमीटर तपशिलाची पडताळणी, पाणी शुल्क आकारणी, बिलिंग व वसुली संगणकीकरणासाठी आवश्यक प्रणाली विकसित करून कार्यान्वित करावी लागेल.
बाजारपेठा तसेच व्यापारांतर्गत व्यावसायिक आस्थापनांचे सर्वे क्षण, व्यवस्थापन, मूल्यांकन व संगणकीकरणाची कामेही केली जाणार आहेत. यासाठी आवश्यक संगणक आज्ञावली विकसित करणे आणि तांत्रिक साहाय्य पुरविण्याची जबाबदारीही संबंधित एजन्सीवर राहणार आहे.
महापालिका हद्दीतील संपूर्ण
मालमत्तांचे करयोग्य मूल्य व भांडवली मूल्य पद्धतीनुसार सर्वे क्षण, माहिती संकलन, मूल्यांकन आणि कर निर्धारणासाठी सहायक सेवा देण्याचा समावेश आहे. अग्निसुरक्षा व अनुपालन सर्वेक्षण, तसेच महापालिकेच्या स्वमालकीच्या मालमत्तांचेही सर्वेक्षण आणि मूल्यांकन संबंधित नियुक्त केल्या जाणाऱ्या एजन्सीकडून केले जाणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Sol