सिल्लोड येथे शिवसेनेचे बीएलए पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिरासह आढावा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): विशेष मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे बीएलए पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तसेच आढावा बैठक शिवसेना भवन, सिल्लोड येथे उत्साहात संपन्न झाली.

या प्रशिक्षण शिबिरात शिवसेना पक्षाचे मार्गदर्शक प्रशांत घोरपडे व दिग्विजय पाटील यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे, मतदार पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया, बीएलएंची जबाबदारी तसेच प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाची दक्षता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी खासदार तथा छत्रपती संभाजीनगरजालना संपर्क प्रमुख संदीपान भुमरे, माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत विशेष मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेचे गांभीर्य अधोरेखित करण्यात आले. 

प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक व्हावी, अपात्र व बोगस मतदारांची नावे ओळखून आवश्यक कार्यवाही करावी, तसेच कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी बीएलएंनी गांभीर्याने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ई-फॉर्म अचूकरीत्या भरताना घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र बीएलएंनी पांढऱ्या पार्श्वभूमीचा वापरण्याचे महत्त्व, काम करताना ओळखपत्र जवळ बाळगणे, मतदार पडताळणीची प्रक्रिया, स्थलांतरित, मृत, दुबार व बोगस मतदारांची नोंद याबाबत विविध उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत उपस्थित बीएलए व कार्यकर्त्यांनी आपल्या शंका व अडचणी मांडल्या.

त्यांचे मार्गदर्शकांनी उदाहरणांसह समाधान करून काम अधिक प्रभावीपणे कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलएंचा मुंबई येथे विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्कल प्रमुखांनी बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक बीएलएशी सातत्याने समन्वय ठेवावा आणि एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले. तर खासदार संदीपान भुमरे यांनी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन केले. 

याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख 
केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक दामूअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, सतीश ताठे, राजाराम पाडळे, शेख जावेद, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, मुरलीधर काळे, अजिज बागवान, नजीर अहमद, संजय डमाळे, विनोद मंडलेचा, सुखदेव जाधव, राजेंद्र ठोंबरे, धरमसिंग चव्हाण, गोपीचंद जाधव, नगरसेवक शेख इमरान उर्फ गुड्डू, नूर महंम्मद कुरेशी, प्रशांत शिरसागर, आसिफ बागवान तसेच शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शहा, गीता धाडगेंसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, बीएलए व कार्यकर्ते उपस्थित होते.