पैठण, (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवारी आशिर्वाद मंगल कार्यालय पैठण येथे नगर परिषदेच्या होउ घातलेल्या निवडणूक २०२५ च्या प्रभाग क्रमांक १ ते १२ च्या सर्व २५ जागेसाठी व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांची नावे घेण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, महिला आघाडी जिल्हा संघटिका राखी परदेशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख अजय परळकर यांनी केले. स्वतः दत्ता भाऊ गोर्डे यांनी सर्व इच्छुक उमेदवारांची नावे घेतली.
साधारणपणे एकूण २५ जागेसाठी जवळपास ७० ते ७२ जणांनी इच्छुक म्हणून नाव नोंदणी केली. तसेच नगराध्यक्ष पदासाठी अपर्णा दत्ता गोर्डे, राखी राजू परदेशी, दामिनी अजय परळकर, तसलीम राजू पठाण, पुष्पाताई वानोळे, सुमय्या ऐतेशाम गाजी, शिल्पा सतिश पल्लोड यांनी इच्छुक म्हणून नाव नोंदणी केली. याप्रसंगी जेष्ठ नेते रावसाहेब आडसुळ, आप्पासाहेब गायकवाड, सुरेश दुबाले सह पैठण शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी नागरिक मतदार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.