शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) : आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी गावपातळीवर प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आगामी गावपातळीवरील व सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी संघटनात्मक बळकटी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय, सेना भवन येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाप्रमुख केशवराव तायडे, उपजिल्हाप्रमुख देविदास लोखंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्ष बळकटीकरण, संघटना मजबूत करणे आणि गावपातळीवर प्रभावी काम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. पुढे बोलताना शिवसेना पक्षाची कामगिरी अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचेही आवाहन करण्यात आले.

  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनःनिरीक्षण कार्यक्रम (SIR) बाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या परिसरात येणाऱ्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांना सहकार्य करून मतदारांनी आपली माहिती अचूक असल्याची खात्री करावी तसेच आवश्यक असल्यास नोंदणी व दुरुस्ती वेळेत करून घ्यावी, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. सुयोग्य व शुद्ध मतदार यादीसाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे , उपसभापती संदीप राऊत ,जि. प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासिर हुसेन , देविदास लोखंडे , माजी सभापती रामदास पालोदकर, दुर्गाबाई पवार , राजू बाबा काळे , समी चाऊस, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृउबा  समितीचे संचालक दामू अण्णा गव्हाणे ,नानासाहेब रहाटे ,जयराम चिंचपुरे, सतीश ताठे, रमेश लाठी, शेख जावेद, तसेच गुड्डू आप्पा नगरे , सुखदेव जाधव , डॉ. संजय जामकर,  प्रा. मन्सूर कादरी, कौतिकराव मोरे, राजूमिया देशमुख, संजय डमाळे, राजेंद्र ठोंबरे , डॉ. विठ्ठल जाधव ,अंबादास सपकाळ, सयाजीराव वाघ, मधुकर गवळी ,अंबादास शिंदे, रुपेश जयस्वाल, कृष्णा बावस्कर, गणेश पाटील ,गुलाबराव मिरगे, अक्षय मगर आदींसह तालुक्यातील विविध गावातून आलेले सरपंच - माजी सरपंच, शिवसेना पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
One attachment  •  Scanned by Gmail