फुलंब्रीत विकास कामांचा आढावा घेत पर्यावरण दिनी वृक्षारोपणाचा संदेश

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी विविध शासकीय योजना व विकास कामांचा आढावा घेतला.
मुर्शिदाबादवाडी येथे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास नीलम बाफना, पूजा वंजारी, प्रसाद खेडेकर, योगिता खटावकर, सहाय्यक प्रकल्प संचालक खळेगावकर यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.