घर सोडलेल्या दोन मुलांना रिक्षाचालकाने सोपवले कुटुंबीयाकडे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : रागाच्या भरात घर सोडलेल्या ७ आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन भावंडांना एका रिक्षाचालकाने आश्रय देऊन सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. रिक्षाचालक सय्यद समीर सय्यद जलील (रा. पंढरपूर एमआयडीसी) यांचे याबद्दल कौतुक होत आहे. बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीमनगर येथील दोन्ही भावंडे १३ जुलै रोजी घरातून निघून सिटी बसने शहरात आले. मुले बेपत्ता झाल्याने चिंतेत
असलेल्या कुटुंबीयांनी बिडकीन पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसरात शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, शहरात रिक्षा चालवताना समीर यांना ही मुले भटकताना दिसली. दोघांना आपल्या घरी नेऊन निवारा दिला. दोन दिवसांनी मुलांनी नातेवाईकांचा फोन नंबर सांगताच समीर यांनी कुटुंबीय व पोलिसांशी संपर्क साधून मुलांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions