खून प्रकरणी रिक्षाचालकाला बेड्या

Foto

गांधेली फाट्याजवळील घटना; आरोपीचे दारूच्या नशेत कृत्य
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
आढळलेल्या बेवारस आरोपी रोहा अलीस
गांधेली फाट्याजवळील झुडपात १५ जुलै रोजी मृतदेहाच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका रिक्षाचालकानेच प्रवाशाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शेख अनीस शेख अनिब (२६, रा. देवळाई) या आरोपी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
बायपास परिसर टोळ्या अवैध धंद्याचे केंद्र
गांधेली परिसर आणि संपूर्ण बीड बायपास गुन्हेगारी आणि अनैतिक कृत्यांचे केंद्र बनत आहे. काही दिवसांपूर्वी, या भागातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीच्या सदस्यांवर एका वकिलाची हत्या केल्याचा आणि इतर अनेकांना लुटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एस क्लब चौकात या लोकांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गाडी थांबवून, अश्लील शेरेबाजी केली आणि पैशांची मागणी केली. या गंभीर घटना घडूनही, अशा टोळ्या उघडपणे सक्रिय आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलैच्या सार्यकाळी आरोपी शेख अनिस याने झाल्टा फाट्यावरून गोरख अर्जुन राऊत (वय ३५, रा. गेवराई, जि. बीड) यांना रिक्षात बसवले. त्यानंतर दोघे केंब्रिज चौक व जुना बीड बायपास परिसरात सुमारे तासभर फिरले. या दरम्यान त्यांनी एकत्र दारूचे सेवन केले.
त्यानंतर दोघे गांधेली फाट्याजवळ आले, तेथे पुन्हा दारू पित असताना वैयक्तिक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी शेख व राऊत यांच्यात हाणामारी झाली. आरोपी शेख याने राऊत यांच्या डोक्यात दगड घातला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घाबरलेल्या
सीसीटीव्हीतून उलगडा गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज,
तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवल्यानंतर रिक्षाचालक शेख अनिस याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गंभीरराव, संदीप तायडे, कैलास काकड, संतोष पाम्चे, मनोज विखणकर, विजय निकम, विजय घुगे, प्रमोद सुरसे आदींनी केली.
आरोपीने मृतदेह झाडाझुडपात टाकून
घटनास्थळावरून पलायन केले. १५ जुलै रोजी गांधली फाट्यासमोरील झाडीत कुजलेल्या व नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
शवविच्छेदन
अहवालात
डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.