'पंचतारांकीत टेस्ट' ला भारी रस्त्यावरची वडापाव गाडी !

Foto
प्रत्येक शहराची स्वतःची अशी खाद्य संस्कृती असते. औरंगाबाद शहरही त्याला अपवाद नाही. हळूहळू शहर वाढत गेले. दोन अडीच लाख लोकसंख्येचे 15 लाखांपर्यंत पोहचले. पोट भरण्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍या बरोबरच देशभरातील विविध भागातील माणसं शहरात आले, स्थिरावले आणि येथलेच झाले. त्यांच्या बरोबर त्या-त्या भागातील खाद्य संस्कृती ते घेऊन आले आणि या निरनिराळ्या खाद्य संस्कृतीतून आता तयार झाली औरंगाबाद शहराची खाद्य संस्कृती !
70-80च्या दशकात गुलमंडीवरील मेवाड आणि कामाक्षी, औरंगपुर्‍यातील गोकुळ, चेलिपुर्‍याच्या उतारावरील माधव आश्रम किंवा राजा बाजार मधील विजय-विलास आणि दुग्ध सागर आणि हो पैठण गेटवरील कॅफे म्हैसूर तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अड्डाच होता. आता हे चित्र बदलले आहे. विद्यार्थ्यांची आवड , निवड जिजामाता कॉलनी, निराला बाजार भागात झिरपत चालली असल्याचे चित्र आहे. खरे तर शहर इतके वाढले आहे की, प्रत्येक भाग एक वेगळी वसाहत झाले आहे. कॉलेजही वाढले आहेत. अनेक मोठमोठी हॉटेल्स उभी आहेत. जुनी नावे गळत आहेत, नवीन उदयास येत आहेत. शहराच्या विस्ताराबरोबर गरजाही वाढल्या आहेत आणि खाद्य संस्कृती म्हणाल तर ‘व्यक्‍ती तितकी प्रकृती’ न्यायाने खूप बदल होत गेला आहे.
शहरातील बहुतांश हातगाड्या, स्टॉल्स या  रात्री चालू होतात. हनुमाननगर चौकात  अर्जुन देशमुख यांची समोस्याची हातगाडी आहे. त्यांनी सांगितले बी. ए डीएड चे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न मिळाल्यामुळे आपण हा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सांभाळत त्यांना एलएलबीचे शिक्षण  घ्यायचे आहे. त्या भागातच नारायण कुमावत यांची भेळ - दाबेली , आईस्क्रीमची गाडी आहे. संध्याकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत ते  गाडा चालवतात. त्याच्या पुढे अनेक छोट्या मोठ्या हातगाड्या उभ्या दिसल्या.गजानन मंदिर रोडपर्यंत अशा बर्‍याच हातगाड्या उभ्या होत्या. त्यापुढे त्रिमूर्ती चौकात पंचवटी पावभाजी हातगाडी आहे.सिडकोच्या कॅनॉट भाग ’ फूड कल्चर’ मुळे प्रसिद्ध आहे आणि रात्री आठच्या पुढे तर सर्वच खाणाशौकीनांचा याठिकाणी मेळावा भरतो. सध्या सर्वांनाच आवडणारा आणि आधुनिक आणि पारंपरिकतेचा संगम असलेला  ’ मोमोज’ हा पदार्थ . धनराज आणि श्री साई मोमोज या दोन हातगाड्यावर स्टीम, तंदुरी, फ्राय या तिन प्रकारांमध्ये चिकन, पनीर, व्हेज या प्रकारांचे मोमोज येथे एकत्रितपणे मिळतात. ’ पाटील भांडार’ नावाच्या एका छोट्या हातगाडीवर ’ समोसा चाट ’ नावाने मिळणारा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे, याठिकाणी  तर लोक वेटिंगमध्ये असतात.पाणीपुरीच्या गाड्या सगळीकडेच दिसतात, परंतु कॅनोट मध्ये ’ नाद खुळा ’ हि पाणीपुरीची गाडी लक्षवेधक स्वरुपाची आहे. याठिकाणी स्वच्छतेची अतिशय काळजी घेतली जाते, यांचे नाद खुळा नावाने फेसबुक पेज देखील आहे, पाणीपुरी वाला म्हणजे अशिक्षित असे चित्र पाहायला मिळते.  येथे अस्सल इंग्रजीत संवाद साधला जातो.याचठिकाणी देवेंद्र सिंग या पंजाबी व्यावसायिकाची ’ कुल्फी ’ची गाडी देखील तरुणांसाठी आकर्षण आहे.

शहरात जेवढ्या हात गाड्या आहेत त्यांच्या पर्यंत पोहोचून इन्स्पेक्शन केले जाते. स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाते. संबंधित व्यक्तीचे लायसन्स ,फुड रजिस्ट्रेशन तपासले जाते. ज्या व्यावसायिकांकडे लायसन्स, रजिस्ट्रेशन यांपैकी काहीही नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
- मिलिंद शहा,
अन्न व औषध प्रशासन विभाग, अधिकारी

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker