पायलटवर कोणाचा दबाव होता का? अजित पवार विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा संशय बळावला!

Foto
 नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सातत्याने अजित पवार यांच्या अपघाती निधनावर प्रश्न उपस्थित केले. मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची शंका पुराव्यानिशी उपस्थित केली. याकरता विविध स्तरांवर चर्चा करत असून याचा तपास लागण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, त्यांनी आज पुन्हा अमहदाबाद विमान दुर्घटनेचा धागा पकडत या प्रकरणाचा सखोल तपास झालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक्स पोस्ट केली आहे.

अहमबदाबाद विमान दुर्घटनेविषयी इटालियन वृत्तपत्राने एक धक्कादायक वृत्त दिले होते. त्यांनी भारत आणि अमेरिकेतली सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं होतं की, या दुर्घटनेत पायलटने जाणीवपूर्वक इंधन पुरवठा बंद केला होता, असा अंतिम निष्कर्ष काढून भारतीय तपास यंत्रणा अहवाल सादर करणार आहे. इटालियन वृत्तपत्राच्या या वृत्ताने भारतात खळबळ माजली आहे. यावरूनच रोहित पवारांनीही अजित पवारांच्या विमान अपघातात पायलटवर कोणाचा दबाव होता का? याचा तपास करण्याचे आवाहन केले आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार म्हणाले, अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे.

या पोस्टसहित त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राइज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील उतारा आहे. त्यात लिहिलंय, दुसर्‍या बाजूला डागनने हसत आपल्या आवडत्या कार्यपद्धतीत म्हटलं की कधी कधी सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे चालकाला ठर करणे आणि तेवढेच पुरेसे असते.

दरम्यान, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत इटालियन वृत्तपत्राने दिलेले वृत्त भारताने फेटाळून लावले आहे. एएआयबीने याबाबत खुलासा करत हा दावा चुकीचा आणि काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे.