प्रवाशाला मारहाण करीत हिसकावले ६ हजार रुपये

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कार प्रवासाचे भाडे दिल्यानंतरही प्रवाशाला मारहाण करून त्याच्या खिशातील ६ हजार रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना महावीर चौक पेट्रोल पंप परिसरात २६ जून रोजी रात्री घडली.
चालकासह याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक जहागीरदार रसोद्दीन अनिसोद्दीन शेख आणि
त्याच्या साथीदाराचा आरोपींमध्ये समावेश आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजय नंदराम घोडके (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) हे आरोपीची कार किरायाने घेऊन शहरात आले होते.
२५ जून रोजी रात्री १:२० वाजेच्या सुमारास महावीर चौक पंप परिसरात आल्यानंतर त्यांनी कारचालक जहागीरदार रसोद्दीन
अनिसोद्दीन शेख यास त्याचे भाडे दिले.
यानंतर ते जाताच आरोपी जहागीरदार आणि त्याने बोलावलेल्या साथीदाराने त्यांना अडवून पैशांची मागणी केली. जाब विचारताच मारहाण करून त्यांच्या खिशातील ६ हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर आरोपी कारमधून पसार झाले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक साकळे तपास करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions