ग्रामीण कोरोनाबळी ः एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात टक्‍का वाढला

Foto
410 रुग्णांपैकी 268 मृत ग्रामीण भागातील  
 गंगापूर, सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक रुग्णांचे मृत्यू
 शहरात संसर्गाचा आलेख उतरत असताना ग्रामीण भागात वाढता मृत्यूदर धोक्याची घंटा मानली जात आहे. 1 एप्रिल ते 16 मे या 46 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 1252  जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. यापैकी 687 मृत्यू ग्रामीण मधील आहेत तर 575 शहरातील. मे महिन्याच्या सोळा दिवसांमध्ये मात्र जीव गमावलेल्या 410 रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक 268 जण ग्रामीण भागातील आहेत. एप्रिलच्या साधारण 54 टक्क्यांपेक्षा मेमधील टक्केवारी जवळपास 65 टक्यांपर्यंत जाते. ग्रामीण भागातील ही आकडेवारी धक्कादायकच म्हणावी लागेल. गंगापूर आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याचे सांजवार्ताच्या पडताळणीत पुढे आले.
पहिल्या लाटेत ग्रामीण भागात रूग्ण संख्या फार कमी होती. त्यामुळे मृत्यू देखिल फार कमी होते. या लाटेत मात्र कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात अधिक झाला आहे. ताज्या आकड्यात, शहरापेक्षा तिप्पट रूग्ण ग्रामीण भागातील आहेत. गेल्या दीड महिन्यातील एकूण मृत्यूंमध्ये निम्यापेक्षा जास्त ग्रामीण भागातील आहे. मे महिन्यात हा दर वाढत असल्याने चिंता देखिल वाढत आहे.  
चालू महिन्यात 1 ते 16 मे या सोळा दिवसांत जिल्ह्यातील 410 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली असून 410 पैकी 142 रुग्ण शहरातील तर 268 रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडा शहराच्या तुलनेत वाढला असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. 31 मार्च रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडा हा 1670 वर होता. मात्र त्यात 30 एप्रिल पर्यत 842 रुग्णांचा मृत्यू झाले. आणि जिल्ह्यातील  एकूण मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडा हा 30 एप्रिलला 2512 वर जाऊन पोहोचला. त्यात 1 ते 16 मे पर्यत 410 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने 14 मे रोजी जिल्ह्यातील एकूण मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडा हा 2878 वर गेला. त्यातच 15 मे रोजी आणखी 26 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र यातील 19 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तसेच 16 तारखेला ग्रामीण भागात 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आणि आज जिल्ह्यातील मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडा हा 2922 वर जाऊन पोहचला आहे.
एप्रिल महिन्यात ग्रामीण 419 रुग्णांचा  मृत्यू
एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील मृत्यू होणार्‍या रुग्णांचा आकडा पाहिला तर महिनाभरात 842 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यात 419 रुग्ण हे ग्रामीण भागातील होते तर 423 रुग्ण हे शहरातील होते. त्यात महिन्याभरात सर्वात जास्त प्रतिदिन मृत्यू 20, 21, 25, 28 या तारखेला प्रतिदिन 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तर 24 ला एकाच दिवशी ग्रामीण भागात 21, 30 एप्रिलला 22 रुग्णांचा मृत्यू झाले.
 मे महिन्याची सुरूवातच अधिक मृत्यूने..
मे महिन्यात ग्रामीण भागात 268 रुग्णांचा मृत्यू झाला. 3 आणि 12 मे रोजी प्रत्येकी 21  तर 4 तारखेला सर्वाधिक 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 6  आणि 14 तारखेला प्रत्येकी 20 मृत्यूची नोंद झाली.
गंगापूर, सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद
1 एप्रिल ते 16 मे दरम्यान तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक 109 मृत्यू गंगापूर तालुक्यात झालेत. तर सिल्लोड तालुक्यात 108 कोरोना बळी गेलेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद तालुक्यात 100, वैजापूर 94, कन्नड 91, पैठण 93 मृत्यू झालेत. फुलंब्री तालुक्यातील 41, सोयगाव तालुक्यात 28 रुग्णांचा तर तर सर्वात कमी  खुलताबाद तालुक्यात 23 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker