स्थापत्यकला व शिल्पकलेवर सचिव डॉ. संजय पाईकराव यांनी केले मार्गदर्शन
शहरतामा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): प्राचीन इतिहास, पुरातत्त्वीय ज्ञान, अध्यात्मिक ओळख ते निसर्गाची जवळून अनुभव देणारा हेरिटेज ट्रेल इतिहासप्रेमींनी अनुभवला. शहरनामा टीमच्या वतीने आयोजित पितळखोरा ते पाटणादेवी या हेरिटेज ट्रेलमध्ये ४० हून अधिक जणांनी या परिसराची प्रत्यक्ष ओळख करून घेतली. एमजीएम विद्यापीठाचा इतिहास व पुरातत्त्व विभाग, आख्यान फाउंडेशन, गरवारे कम्युनिटी सेंटर, एडगाइड मीडिया प्रा. लि., रोटरी क्लब ऑफ छत्रपती
संभाजीनगर ईस्ट आणि केंद्रीय पर्यटन विभाग व टीम शहरनामा यांनी केले होते.
मुर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ. संजय पाईकराव आणि एमजीएम विद्यापीठातील पुरातत्वविद आशुतोष पाटील यांनी पितळखोरा व पाटणादेवी परिसरातील इतिहास, पुरातत्त्वीय अवशेष, स्थापत्यकला, शिल्पकला, शिलालेख आणि सांस्कृतिक वारसा यावर मार्गदर्शन केले. पितळखोरा लेणीची माहिती देताना पाईकराव यांनी पितळखोरा लेणीचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचीन व्यापारी
संस्मरणीय अनुभव
लेणी, शिल्पे, शिलालेख, प्राचीन वास्तू आणि त्यामागील इतिहास याबाबत सहभागींनी प्रश्न विचारत उत्स्फूर्त संवाद साधला. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचलेला वारसा प्रत्यक्ष स्थळावर जाऊन अनुभवता आल्याने हा अनुभव अत्यंत वेगळा आणि संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली. यावेळी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, रमाकांत रौतल्ले, भारत पर्यटन विभागाच्या सहाय्यक निदेशक स्नेहल पाटील उपस्थित होत्या
मार्गांशी या परिसराचा असलेल्या या लेणीचा संबंध बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने पितळखोऱ्याला विशेष महत्त्व आहे. सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पितळखोरा लेणी हा महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध शैलगृहांचा महत्त्वपूर्ण समूह आहे.
या लेण्यांमध्ये चैत्यगृह, विहार, स्तूप, शिल्पकला आणि विविध पुरातत्त्वीय अवशेष पाहायला मिळतात. निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेली ही लेणी पाहताना
सहभागींचा इतिहास आणि निसर्गाशी संवाद घडला. यानंतर पाटणादेवी मंदिर परिसराला भेट देण्यात आली. निसर्गरम्य परिसरात वसलेले पाटणादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. प्रसिद्ध गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांच्याशी निगडित संदर्भ या परिसराशी येत असल्याने पाटणादेवीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यायला हवे, असे तज्ज्ञांनी सांगितले.









