गोळेगाव खुर्द येथे एसटी बस थांब्याला अखेर मंजुरी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या मार्गावरील उंडणगावपानवडोदचौफुली (गोळेगाव खुर्द) येथे सर्व एसटी बसेसना थांबा मिळावा, या मागणीला अखेर यश आले आहे. 

भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी मोर्चाच्या उपजिल्हाध्यक्ष रीना इंगळे यांनी विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत विभाग नियंत्रकांनी गोळेगाव खुर्द येथे सर्व एसटी बसेस थांबवून प्रवाशांना चढ उतार करण्याबाबत संबंधित आगार व्यवस्थापकांना लेखी आदेश दिले आहेत.

गोळेगाव खुर्द, उंडणगाव, पानवडोद परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांग व्यक्ती आणि सर्वसामान्य प्रवाशांना एसटी बससेवेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक बस या ठिकाणी थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. 

ही समस्या लक्षात घेऊन सौ. रीना संदीप इंगळे यांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी विभाग नियंत्रकांकडे निवेदन सादर केले होते. या मागणीसाठी गोळेगाव खुर्दचे प्रशासक तथा माजी सरपंच गणेश बनकर यांनीही पुढाकार घेऊन बस थांब्याची मागणी केली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विभाग नियंत्रक कार्यालयाने २७ ऑक्टोबर रोजी संबंधित आगार व्यवस्थापकांना लेखी होते.

सूचना दिल्या. एसटी बस थांब्याचा फलक लावून चालक व वाहकांना सूचना देण्याबाबत निर्देशित केले आहे. १२ नोव्हेंबर रोजी यानिमित्त एस टी महामंडळ सिल्लोड आगाराचे प्रतिनिधी गजानन केनेकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन वाघ, सरपंच गणेश बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश बनकर, उपसरपंच अनिल बनकर, माजी सरपंच कृष्णा उखर्डे, माजी सरपंच दिलीप पाटील, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित