सचिन अहिर फुटले ! उपसभापती पदासाठी अर्ज दाखल !! एकनाथ शिंदेंकडून पुन्हा उद्धव ठाकरेंचा गेम...

Foto
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा एक मोठी घडामोड घडली आहे. आठ दिवसात शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा राजकीय धक्का दिला आहे.शिंदे सेनेने ठाकरे गटाला दिलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर फुटले आहेत. ठाकरे गटाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. सचिन अहिर यांनी विधानसभेत वरळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा राजकीय झटका बसला आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विधान परिषदेचं उपसभापती देण्यात आलं आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (२९ जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोर्‍हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते. मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर हे पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असा आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर तातडीने शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती आहे.  वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केला आहे शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

सचिन अहीरांचे पक्षांतर का मोठे? 
सचिन अहिर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. आदित्य ठाकरेंसाठी सचिन अहिरांनी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला होता.वरळीत राहणार्‍या विधानपरिषदेच्या दोन आमदारांपैकी सचिन अहिर एक आहेत. काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडून सचिन अहिर यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती. शिवसेनेत आल्यास उपसभापतीपदाची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. विशेष म्हणजे सहा खासदारांना खेचल्यानंतर सचिन अहिरांनाही घेऊन शिंदेंनी ठाकरे-पिता पुत्रांना मोठा धक्का दिला आहे. 

सचिन अहिर मूळचे शिवसैनिक- संजय शिरसाट 
सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. त्यांनी पक्षांतर केलं नाही तर शिवसेनेतच प्रवेश केला. जे येतायत त्यांची मानसिकता ढासळली आहे. आम्हाला वेगळं ऑपरेशन करायची गरज नाही. सचिन अहिर मूळचे शिवसैनिक आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली.