मुंबई: कर्नाटक काँग्रेसचे ’संकटमोचक’ अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार, जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षाचे आमदार शिवलिंगे गौडा इतर काही काँग्रेस नेत्यांसह राज्य सरकारवर आलेले संकट दूर करण्याच्या उद्देशाने नाराज बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले आहेत. मुंबईतील ज्या हॉटेलमध्ये हे 10 आमदार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये हे नेतेही पोहोचले आहेत. मात्र, शिवकुमार यांची काँग्रेसच्या आमदारांची भेट घेऊ शकतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शिवकुमार यांना काँग्रेस आमदारांना भेटता येणार नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याच होटेलात आपण खोली बुक केल्याचे शिवकुमार यांनी सांगितले आहे. कुणालाही धमकी देण्याचा प्रश्न उद्भवत नसून, निर्माण झालेले मतभेद चर्चेने सोडवता येतील, आणि त्याचसाठी आम्ही आलो आहोत, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.
मुंबईत पोहोचलेल्या शिवकुमार यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते नारायण गौडा यांचे समर्थक हॉटेलबाहेर घोषणाबाजी करत आहेत. येथे निर्माण झालेला तणाव पाहता हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे डावपेच हाणून पाडण्याच्या उद्देशाने भाजप नेते, माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक आणि माजी विधानसभा अध्यक्ष के. जी. बोपैय्या हे देखील मुंबईत पोहोचले आहेत. भाजपचे हे दोन नेते या आमदारांना बेंगळुरूला घेऊन येणार आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसचे नेते मुंबईत आल्याचे समजताच आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्रच या आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. आमदारांच्या या पत्रानंतर हॉटेलाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, हॉटेलात राज्य राखीव पोलीस दल आणि दंगलविरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे.
मित्रांना भेटण्यासाठी आलो- शिवकुमार
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरातील पुरातन वास्तुंची जपणूक करणे ही सर्वसामान्य नागरिकांची देखील जबाबदारी असुन या पुरातन वास्तुंचे विद्रुपीकरण न करण्याचे भान नागरीकांना कधी आणि शहरातील नागरिकांच्या सामाजिक जाणिवेच्या कक्षा कधी रूंदावणार हे ही अनुत्तरितच आहेत