खुलताबाद, (प्रतिनिधी) : येथील नगर परिषदेत शहीद क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल म्हणाले की, शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी अत्यंत तरुण वयात देशाच्या स्वातंत्र्यांसाठी हसत हसत बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान भारतीय तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते गजानन फुलारे, नगरसेवक बाळासाहेब बारगळ, उमेश आवारे, मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन, योगेश बारगळ, काँग्रेस शहराध्यक्ष मजीद मणियार, तोसिफ शरफोद्दीन, माजेदोद्दीन इक्रामुद्दीन, कार्यालयीन अधीक्षक रूस्तम फुलारे, गणेश पवार, तुकाराम तांगडे आदी उपस्थित होते.












