औरंगाबाद : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातीळ कामगार, कष्टकरी यांच्यासाठी शिवसैनिकांची फळी तयार केलीआहे. या फळीच्या माध्यामातुन व जनता जनार्धनाच्या आशिर्वादामुळेसंभाजीनगरचा आवाज दिल्लीत असल्याचा विश्वास शिवसेना नेते खासदारचंद्रकांत खैरे यांनी सोयगाव तालुक्यातील बनोटी गोंदेगाव येथील जाहीरसभेत व्यक्त केला.
शिवसेनेच्या विकासामुळे शहरीभागासह डोंगरद-यातील गावांना जिल्हाविकास निधी, डोंगरी विकास निधी, आदिवासी समाजकल्याण आदी योजना पोहचविण्यासाठी शिवसैनिकांच्या प्रयत्नांना आज मोठे यश आले आहे. सोयगाव सारख्या छोटयाशा तालुक्यातही नगरोत्थान योजना पोहचविली हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सोयगाव तालुका हा पूर्वीपासून शिवसेनेंचा बालेकिल्ला असुन ग्रामपंचायत ते नगरपंचायत, जिल्हापरिषद सारख्या जागाही शिवसेनेंच्या ताब्यात आहे. यामुळे शिवसेनेचे जाळे भक्कम असल्याने विरोधी पक्ष हे जाळे तोडण्याचे प्रयत्न करीत आहे. आपल्याच लोकांचा वापर करुन आपल्या विरुध्द कटकारस्थान रचण्याचे त्यांचे षंडयंत्र मायबाप जनता व सुज्ञ मतदार पुर्ण होऊ देणार नाही, असेही ठाम मत शिवसेना भाजपमहायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेना भाजप महायुतीच्या पदधिका-यांनी ही आपले मत मांडले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, रघुनाथ चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, ह.भ.प. पारस महाराज, शिवसेना तालूका प्रमुख दिळीप मचे, भाजपा तालुका अध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अकुंश रंधे, जि.प सदस्य मोनाली राठोड, उदयसिंग राजपुत,सुपडु पाटील, भद्री राठोड, दामु बागíळ, विलास राठोड, गजानन चौधरी, धनलाल मंडावरे, रमेश खोतकर, आतुल बोरसे, प्रशांत चौधर, गौरव बिंदवाळ, दिपळ मंडावरे, महाजन सर, लता चौधरी, जंगळ गायकवाड, मंगेश महाळपुरे, गोरख निकम युवासेनेचे तालुका आधिकारी स्वप्निल पाटील, शरद वाणी, प्रशांत चौधरी,रमेश बिंदवाल, आकाश महालपुरे, कुणाळ महालळपुरे, आदींची उपस्थिती होती.