औरंगाबादचे संभाजीराजे देणार थेट मोदींना आव्हान; वाराणसीतून भरणार आपला उमेदवारी अर्ज

Foto
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांनी मोठी भाऊगर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. सैनिकांना निकृष्ठ जेवण मिळण्याबाबत तक्रार केलेल्या निलंबित सैनिकाने मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा याआधीच केली आहे. त्याच बरोबर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलन करणार्या तमिळनाडूच्य शेतकर्यांनी देखील मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहिर केलं आहे. या नावांमध्ये आता महाराष्ट्रातील आणखी एक नाव जोडले जाणार असुन औरंगाबादचे संभाजीराजे भोसले हेदेखील मोदींविरोधात निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले.
औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भोसले म्हणाले की, मोदींनी जेव्हा नोटबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हा मलाही तो चांगला निर्णय वाटला होता. मात्र, नोटबंदी करून काहीही साध्या झालेले नाही. उलट त्यांच्याच पक्षाचे आमदार काळे पैसे बाळगणार्यांना अभय देत आहे असा गंभीर आरोप त्यांनी शहरातील एका आमदारांवर केला. शहराला गृहमंत्री नसतात मात्र, औरंगाबादचे गृहमंत्री म्हणून ज्या आमदारांची ओळख आहे त्या आमदाराने आपल्याला त्रास दिल्याचे देखील संभाजी राजे यांनी सांगितले. मोदींविरोधात निवडणूक लढषण्याविषयी विचारले असता, मी काही प्रसिध्दसाठी करत नसुन नोटबंदी, गोष्टी यासारख्या गोष्टींचा सामान्य जनतेला त्रास झाला. एकंदरीत देशातील वातावरण पाहिले तर जातीय आणि धार्मिक ध्रुविकरणाचे प्रकार वाढले आहेत या सर्वांविरुध्द लढण्यासाठी आपण थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.