सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये अजब कारभार; चार्जरमध्ये बिघाड असल्यासही ठेऊन घेत आहेत मोबाईल

Foto
औरंगाबाद: आघाडीची मोबाईल कंपनी सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरमधील अनागोंदी कारभाराने सामान्य लोक त्रस्त झाले आहे. मोबाईलमध्ये कुठलीही बिघाड झाली तरी तात्काळ दुरुस्त करून न देता मोबाईल ठेऊन घेतला जात आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त आहेत. 

 आज तर या सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी हद्दच केली. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एक ग्राहक क्रांतिचौक येथील सॅमसंग कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये चार्जर मधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आले असता  सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी चक्क मोबाईल ठेऊन देण्यास सांगितले तसेच मोबाईल मधील सर्व माहिती काढून टाकावी लागेल असे देखील सांगितले. चार्जरमध्ये बिघाड असताना मोबाईल ठेवण्याची कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी बघून मोबाईल ग्राहक चक्रावून गेले होते. अनेक दैनंदिन कामे आजरोजी मोबाइलद्वारेच केली जातात. अनेक कार्यालयीन कामांसाठी सुद्धा हल्ली मोबाईलची आवश्यकता भासते. मात्र, चार्जर मधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोबाईल ठेऊन घेण्याची अतार्किक मागणी ऐकुणी संबधीत ग्राहक हैराण झाल्याचे आढळून आले. 

 मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये असे प्रकार वारंवार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्याच्या या वागण्याचा सर्वसामान्य ग्राहकांना त्रास होत असून अशा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.