हिरडपुरी येथे २०० ब्रास वाळू साठ्याच्या लिलावाच्या नावाखाली वाळू चोरी सुरू

Foto
दलाल नाऱ्या पुन्हा झाला सक्रिय 

पैठण, (प्रतनिधी): महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून जुने दादेगाव येथील साठ्याचा लिलाव करून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करण्यात आला आहे त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात वावरणाऱ्या दलाल नाऱ्या ने पुन्हा हिरडपुरी येथील २०० बॉस वाळू साठ्याचा लिलाव करण्याचा घाट घातला आहे. वास्तवता कोणत्याही वाळू घाटाचा किंवा वाळू साठ्याचा लिलाव करायचा असेल तर तो ऑनलाइन निविदा काढून लिलाव प्रक्रिया केली जाते.

या प्रक्रियेत भाग घेणाऱ्याकडून  ऑनलाइन चलन भरून घेतले जाते. तसेच त्याच्याकडे आरटी रिटर्न, तसेच इतर नियमांची पूर्तता करून घेतली जाते परंतु हा नाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याना हाताशी धरून कुठेही साठे उपलब्ध नसताना तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या मार्फत बनावट पंचनामे करून घेऊन वाळू चोरी करण्यासाठी कागदोपत्री वाळू साठा चा लिलाव घडवून आणत आहे.

नाऱ्यामुळे तहसीलदारावर झाली होती 
लाच लुचपत प्रतिबंधक कारवाई  : 
तहसील कार्यालयात वावरणाऱ्या या दलाल नाऱ्या मुळे त्याच्यासह एका तहसीलदारावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई झाल्याची घटना पैठण तहसीलमध्ये घडलेली आहे असे असतानाही पैठण तहसीलचेअधिकारी, कर्मचारी हे या दलाल नान्यामार्फत आर्थिक देवाण-घेवाण करत असल्याचे दिसत आहे. या नाऱ्यापासून महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सावध रहावे नसता पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकरता येत नाही.

हिरडपुरी येथे गोदावरी नदी पात्रातून 
मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा : 
हिरडपुरी येथील २०० ब्रास वाळू साठ्याचा लिलाव झाल्याचे दाखवून विहामांडवा येथील पोलीस अधिकारी व महसूल चे कर्मचारी यांच्या आशीर्वादाने मोठ्या वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक केली जात आहे या ठिकाणी अद्याप कोणताही वाळू साठ्याचा लिलाव झालेला नाही असे असताना लिलावाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.