वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : नागद येथून कन्नड शहरात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर शहर पोलिसांनी कारवाई केली. पो.नि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. नामदेव धोंडकर, पो.ना. मिर्जा बेग, पो. कॉ. सोनवणे, मयूर वाळुंजकर यांचे पथक चाळीसगाव रोडने जात असताना वाळूने भरलेला हायवा हिवरखेडा रोडने कन्नड शहरात येत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. यानुसार टाटा कंपनीचा १० टायर हायवा (एमएच १४ एमएच ८९१४)
पोलिसांच्या पथकाने अडविला. 

याविषयी चालक रवींद्र गणेश राठोड (३५) रा. चंदिकावाडी ता. चाळीसगाव यास विचारणा केली असता, त्याने हा हायवा रघुनंदन एकनाथ पाटील रा. कोठली ता. भडगाव याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी २५ लाख रुपयांचा हायवा आणि ४ ब्रास वाळू (अंदाजे किंमत ४० हजार रुपये) जप्त करून वाहन शहर पोलिस ठाण्यात उभे केले. या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.