औरंगाबाद चे संभाजीनगर कधी होणार ? खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Foto
मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरांचे नामांतर करण्याचा धडाका लावला आहे. बुधवारीच त्यांनी फैजाबाद शहराचे नाव बदलून अयोध्या अस केलं आहे तर काही दिवसांपूर्वी अलाहाबाद शहराचं नामकरण प्रयागराज अस केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही औरंगाबाद चे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर कधी करणार आहात.
योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादच्या नामांतराबरोबर तिथे नवीन तयार होणाऱ्या मेडिकल कॉलेजचे नाव राजा दशरथ यांच्या नावावरून ठेवले जाईल तर विमानतळाला प्रभू श्रीरामाचे नाव देण्यात येणार असल्याचे योगी यांनी जाहीर केले आहे.