सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सभागृहात माहिती
पैठण, (प्रतिनिधी) : कोट्यावधी रुपयाच्या गैख्यवहार प्रकरणी राज्यभर गाजत असलेल्या पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार असल्याचे उत्तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आमदार विलास भुमरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सभागृहात दिली. श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना हा१८ वर्षाच्या भाडेतत्त्वावर सचिन घायाळ शुगर लि. यांना नियम आटीचे पालन करण्याच्या अटीवर चालवण्यास देण्यात आला होता.
५७ कोटी रुपये कर्ज फेडण्याची जबाबदारी सचिन घायाळ यांनी स्वीकारली होती. परंतु त्यांनी ते दायित्व पूर्ण केले नाही उलट त्यांनी कारखान्याची मालमत्ता बेकायदेशीर गहाण ठेवून कारखान्यावर कर्जाचा बोजा करून ठेवला. त्यांनी कराराच्या सर्व अटीचा भंग केला असून शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम थकीत आहे, कामगारांच्या पीएफ ची रक्कम व वेतनाचा प्रश्न सोडवला नाही. सभासदांच्या भाग भांडवलची रक्कम इतरत्र वापरून रकमेचा गैरव्यवहार केला. यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उत्तर देताना सभागृहात सांगितले की, या गैर व्यवहार प्रकरणी लेखापरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने संबंधितावर गुन्हे
शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोट्यवधी रुपयाचे कर्ज घेतले व त्यामध्ये गैरव्यवहार करून त्याची विल्हेवाट लावली. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी होऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे व संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात
लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून केली होती.
-- सहकार मंत्र्यांचा निर्णय --
याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले असून लेखापरीक्षण करणाऱ्या सी.ए. वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकरणाची सहकार अधिनियम कलम ८३ नुसार चौकशीचा निर्णय घेऊन प्रशासनाला कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे असे सभागृहात उत्तर देताना मंत्री यांनी सांगितले.
-- विधानसभा अध्यक्षांचे निर्देश --
आमदार विलास भुमरे यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नाची गंभीर दखल घेत चौकशी तसेच संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश शासनाला दिले. दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी सखोल चौकशी व योग्य ती कारवाई करण्यात येईल असे उत्तर दिले.













