सर न्यायाधीश आर. बी. गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पैठण येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी तसेच संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलन प्रसंगी
बोलतांना माजी आमदार संजय वाघचौरे म्हणाले की देशाच्या सरन्यायाधीशावर हल्ला होणे हा दुर्दैवी व निषेधार्थ आहे.भारताच्या संविधान व लोकशाहीवर विश्वास नसलेल्या मनुवादी प्रवृत्ती न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर हात उचलत आहेत हा एकट्या व्यक्तीवर नाही तर भारतीय न्यायालय पालिकेवर झालेला हल्ला होय असे सांगितले.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, अरुण काळे, अरुण बल्लाळ, ॲड सरोदे, शिवाजी घोडके, डॉ. गुलदाद पठाण, गोविंद शिंदे, किरण शिंदे, पाईक,योगेश जोशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.