पैठण, (प्रतिनिधी) : संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मनपा या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवार, ( दि. २२) फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतामधील २५ राज्यामधील ९३० शहरांमधील १६०० ठिकाणी परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली एकाच वेळी परिसर स्वच्छ करण्यात आला.
जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोक कल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत २२ तारखेला सकाळी ७ ते ११ या वेळेत पैठण येथील गोदावरी नदी मोक्ष घाटचा परिसर या उपक्रमा अंतर्गत स्वच्छ करण्यात आला.
याप्रसंगी पैठणचे माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी नगरसेवक भूषण कावसनकर, नगरसेवक बजरंग लिबोरे, भाऊ वरकड व सेवादल क्षेत्रीय संचालक विजय बोडखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पैठण शाखेचे सेवादल सदस्य हजारोंच्या संख्येने शिस्ती मध्ये या कार्यात सहभागी झाले होते. सेवादल प्रार्थना गीताने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच स्वच्छतेसाठी असलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात आले.
पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ङ्गप्रोजेक्ट अमृतफ्ची सुरुवात केली होती.
जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल. नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने समाजातील प्रत्येक घटकात निसर्गाबद्दल जागरूकता व सहभागाची सशक्त भावना
निर्माण होईल.
सतगुरु मातार्जीचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ङ्गस्वच्छ जल, स्वच्छ मनफ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.












