सारा तेंडुलकर हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली , झाली व्हायरल ....

Foto

गोवा : भारताचा माजी क्रिकेटपटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता एका व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे सारा हिच्यावर टीका होत आहे. सारा तेंडुलकर ही हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यामध्ये रस्त्यावरून फिरत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

सारा तेंडुलकर ही मित्रमैत्रिणींसह नववर्ष साजरं करण्यासाठी गोव्याला गेलेली आहे. तिथे रस्त्यावरून फिरत असताना सारा हिचा फोटो कुणीतरी टिपला. या फोटोमध्ये तिच्या हातात बिअरची बाटली दिसत आहे. दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यापासून लोक त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. तसेच तिच्या विविध पोस्टनां चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत असतो. तसेच तिच्या शांत आणि नम्र स्वभावाचं कौतुक करत असतात. मात्र व्हायरल झालेल्या या फोटोमुळे तिला टीका सहन करावी लागलत आहे.