विद्युत समितीच्या बैठकीत वीजगळती कमी करण्यासाठी योजनांचा घेतला आढावा

Foto
साजवार्ता
Dage 05/11/2026
बैठक

जिल्ह्यात ५६ हजार १९७ मेगावॅट क्षमतेचे सौर संच
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा विद्युत समितीची बैठक खा. संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या परिमंडल कार्यालयात बुधवारी (दि.४) पार पडली. बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील वीजविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच वीजगळती कमी करण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ५६ हजार २०८ घरांच्या छतावर १९७.३७ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर संच बसवण्यात आले आहेत.
यावेळी समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे, सदस्य आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता बीना सावंत, प्रभारी अधीक्षक अभियंता
विनय घनबहादूर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी मुख्य अभियंता ठाकरे यांनी शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांतील कामांची माहिती दिली. गेल्या बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांबाबत कृती अहवालावर चर्चा करण्यात आली. यात स्वंयपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप सोलर योजनेबाबत जनजागृती करण्यात
आलेली आहे. महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट योजनेत जिल्ह्यात ५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेचा
सौरकृषिपंप योजनेस प्रतिसाद
काही वाहिन्यांवर कृषी ग्राहकांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या ठिकाणी लाईन कॅपॅसिटर बसवल्याने कृषी ग्राहकांना योग्य दाबाचा वीजपुरवठा होत आहे. यावेळी सदस्यांना विविध योजनांतून सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीची माहिती देण्यात आली. मागेल त्याला सौरकृषिपंप योजनेस जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत जिल्ह्यात ४४ हजार २२२ सौर कृषिपंप बसवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध होत आहे.
सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवला जाणार आहे. सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेचा पात्र ग्राहकांनी लाभ घेण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकारच्या अनुदानामुळे दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपये, अनुसूचित जाती
व जमातीतील ग्राहकांना ५ हजार रुपये तर शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये हिस्सा भरावा लागत आहे. या योजनेसह पीएम सूर्यघर योजनेचाही जिल्ह्यात चांगला प्रसार करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions