लिहाखेडीतील शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिहाखेडी येथील १९५६ सालची जुनी व जीर्ण पत्र्याची शाळा इमारत सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आली आहे. सततच्या पावसामुळे इमारतीची अवस्था अधिकच खराब झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या शाळेत इयत्ता १ ली ते ७वी पर्यंत सुमारे १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वारंवार प्रशासन व स्थानिक नेत्यांना याबाबत कळवूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

सदर परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तात्काळ नवीन शाळा इमारतीची व्यवस्था करावी, अशी मागणी शालेय समिती अध्यक्ष शंकर डापके, बाजीराव पा डापके दत्ता पा. डापके, गजानन पा. कळात्रे, रोहन डापके ज्ञानेश्वर पा. साबळे, वाळूबा पा.डापके, गणेश कळात्रे, रंगनाथ चव्हाण समाधान पा डापके, राम डापके , ज्ञानेश्वर कळात्रे अशोक दणके अनेक ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे.