गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा जामगाव येथे रूजू झालेले नवनियुक्त केंद्रप्रमुख अजित तांबे यांचा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी अजित तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपली प्राध्यान्यता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी रहाणार आहे, केंद्रांतर्गत सर्वच शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहेत, त्यांना उच्च प्रतीची गुणवत्ता देऊन स्पर्धाक्षम विद्यार्थी घडविण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करूया असे ते म्हणाले. केंद्रीय मुख्याध्यापक प्रसाद शिंगारे, केंद्रांतर्गत शाळांचे मुख्याध्यापक, गावकरी यांच्या हस्ते अजित तांबे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी केंद्र प्रमुख हंसराज काळे, नितीन जाधव, मुख्याध्यापक पडघन, मुख्याध्यापक क्षिरसागर, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय बांद्रे, झाडाची भिसी गृपचे पवन ठोंबरे, मुख्याध्यापक अजित राजळे, शिक्षक विजय पठारे, पठारे, सुनील भापकर, शिक्षिका गंगुबाई पगारे, ज्योती दाते, ज्योती गाजुलवार, तांबे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक कडुबा हारदे यांनी केले तर आभार सुनील भापकर यांनी मानले.