छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आ. अमित देशमुख यांचा वाढदिवस जितेंद्र देहाडे युवा मंचच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. आ. अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप, अन्नदान, संस्थान गणपती येथे आरती, शहागंज येथील गुरूद्वारा येथे अरदास, बुद्ध लेणी येथे वंदना व फळवाटप तसेच शहानूरमिया दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, नरेश पाखरे, मोहित जाधव, गुरमित गिल, सागर नागरे, मोईन कुरेशी, अजय डिडोरे, शिरिष जाधव, साजिद कुरेशी, नदीम ईमानदार, राकेश कांबळे, गणेश वैष्णव, सोनूकुमार पाईकडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.












